Maharashtra Nivadnuk Nikal 2024: लोकसभा निवडणुकांचे निकाल आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहेत. राज्यात 48 मतदारसंघातील काही मतदारसंघातील निकाल स्पष्ट झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होती. तर, संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं ते म्हणजे सेना विरुद्ध सेना यांच्या लढतती जनतेला कौल कोणाच्या पारड्यात पडतो. सेना विरुद्ध सेना या लढतीत ठाकरेंची सेना वरचढ ठरली आहे. नागरिकांनी उद्धव ठाकरे यांना कौल दिला आहे. या निकालाने शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने शिवसेनेत फुट पडली. शिवसेनेच्या अनेक आमदार व खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला. उद्धव ठाकरे यांच्या हातातून पक्षाचे चिन्ह व नावही गेले. पक्षाच्या फुटीनंतर ठाकरे गटाने नवीन नाव आणि पक्षचिन्ह घेत निवडणुकीच्या रिंगणात उतरले. शिंदे गट आणि भाजप यांच्या विरोधात लढण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली होती. लोकसभा निवडणुकीसाठी 13 लोकसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशी लढत झाली होती. 


राज्यात 13 लोकसभा मतदारसंघात ठाकरे व शिंदे गटाचे उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. त्या 13 जागांपैकी 8 जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, 6 जागांवर शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी बाजी मारली आहे. हा निकाल सर्वांनाच थक्क करणारा आहे. 


उद्धव ठाकरे गटाचे विजयी उमेदवार


1) उत्तर पश्चिम- अमोल किर्तीकर 
2) दक्षिण मध्य - अनिल देसाई
3) दक्षिण मुंबई- अरविंद सावंत
4) ईशान्य मुंबई - संजय दिना पाटील 
5) नाशिक - राजाभाऊ वाजे 
6) शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे  
7) हिंगोली - नागेश पाटील 
8) यवतमाळ - संजय देशमुख


एकनाथ शिंदे गटाचे विजयी उमेदवार


1) ठाणे - नरेश म्हस्के
2) कल्याण - श्रीकांत शिंदे
3) हातकणंगले - धैर्यशील माने 
4) मावळ - श्रीरंग बारणे 
5) संभाजी नगर - संदीपान भूमरे 
6) बुलढाणा - प्रतापराव जाधव