ठाणे : ठाण्यात शुक्रवारी सकाळीच आगीची घटना समोर आलीय. ठाणे पश्चिम परिसरातील हरी निवास या भागातील कॅफे कॉफे डे अर्थात सीसीडीच्या एका आऊटलेटला ही आग लागली. आजूबाजूला रहिवासी परिसर असल्यानं या आगीचा मोठा धोका निर्माण झाला होता. परंतु, वेळीच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं... आणि काही वेळातच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर ताबा मिळवलाय. 
 
अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग पसरू नये याची काळजी घेतली जातेय. अद्याप या आगीचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. सुदैवानं, या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.