ठाणे : मनोरमा नगरमधल्या चाळीतले नागरिक सध्या दहशतीखाली वावरत आहेत. ही दहशत नेमकी कोणाची आहे, काय आहे हे प्रकरण? मनोरमा नगर परिसरातल्या चाळींतली नागरिकांनी रात्री झोपण्याचा धसकाच घेतला आहे. कारण मध्यरात्री गाढ झोपेत असताना काही रहिवाश्यांच्या घराचे दरवाजे जोरात ठोठवण्यात येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या सहा ते सात महिन्यांपासून हो विचित्र प्रकार घडत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. इतकेच नाही तर दरवाजा कोण वाजवत असे पाहायला गेल्यावर कळत की बाहेरून चक्क कडी लावली जात आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये दहशतीचं वातावरण असून त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवून त्याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.  


 याप्रकरणी पोलीस तक्रार करण्यात येणार असून  नक्की हा काय प्रकार चालू आहे याचा छडा लावण्यात येईल असं आश्वासन स्थानिक नगरसेविकेने दिले आहे. पोलिसांनी मात्र अद्याप याप्रकरणी तक्रार आलेली नाही,  तक्रार येताच आम्ही कारवाई करू असे सांगितले, मात्र कॅमेरासमोर बोलणं टाळले. त्यामुळे या प्रकरणामुळे परिसरात दशहत निर्माण झाली हे मात्र नक्की.