ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण, तिघांना अटक
ठाण्यात फेरीवाल्यांनी महानगरपालिका कर्मचा-यांना केलेल्या मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी चंद्रमा तिवारीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांनी महानगरपालिका कर्मचा-यांना केलेल्या मारहाण प्रकरणी मुख्य आरोपी चंद्रमा तिवारीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर एक जण फरार आहे. ठाण्यातल्या फेरीवाल्यांनी पुन्हा एकदा ठाणे महापालिकेच्या पथकाला आपलं लक्ष्य केलं होतं.
मंगळवारी संध्याकाळी वागळे इस्टेट परिसरातल्या रामचंद्र नगर परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरोधात, ठाणे पालिकेचं पथक कारवाई करायला गेलं होतं. त्यावेळी काही फेरीवाले पालिका पथकाला मारण्यासाठी धाऊन गेले. यात तीन पालिका कर्मचारी जखमी झाले. मारहाणीचं वृत्त समजातच अतिक्रमण विभागाचे उपायुक्त पोलीस बंदोबस्त घेऊन घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तिथल्या जवळपास 30 टप-या आणि असंख्य हातगाड्या जेसीबीच्या सहाय्यानं जागेवरच तोडल्या गेल्या. पालिका कर्माचा-यांना मारहाण करणा-या दोघांना पालिका पथकाने परिसरात घुसून शोधून काढलं. तर पाच - सहा जण अजूनही फरार आहेत.