ठाण्यात पालिका नालेसफाईचा बोजवारा
महापालिकेने केलेली नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
ठाणे : महापालिकेने केलेली नालेसफाई व्यवस्थित न झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
तसेच नुकत्याच झालेल्या रिमझिम पावसानेही नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शानू पठाण यांनी महापालिका मुख्यालयात फलक झळकावून महापालिकेच्या कारभाराचा निषेध केला.
ठेकेदार आणि अधिका-यांची मिलीभगत असल्याचा आरोपही भगत यांनी केला. महापालिका दरवर्षी नालेसफाईवर ९ कोटी २० लाख रूपयांची तरतूद नालेसफाईवर करते. एकट्या मुंब्रा परिसरातच ५५ नाले आहेत. पण ते वेळीच साफ झाले नाहीत. त्यामुळे ७२ घरात पाणी शिरलं होते. त्यामुळे कंत्राटदाराच्या बिलाच्या पैशातून नुकसान भरपाई दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीने केली.