ठाणे : जिल्ह्यातील काशिमिरा येथील गावातील जमीन एनए ऑर्डर देण्यासाठी १० लाखाची लाच घेत असताना ठाण्याचे तहसीलदार किसन भदाणे यांना लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडले आहे. त्यांच्यासह राम उगले या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मिरारोड जवळ काशिमिरा गावातील जमीन सर्व्हे क्रमांक-५६ आणि ५९ ही जमिनीला एनए करण्यासाठी आणि ऑर्डर मिळवण्यासाठी आलेल्या तक्रारदाराकडून भदाणे यांनी १०लाखाची लाच मागितली होती.


या प्रकरणी तक्रारदार लाचलुचपत खात्याकडे तक्रार केली. मंगळवारी रात्री किसन भदाणे आणि राम उगले यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. किसन भदाणे हे ठाण्याच्या रुस्तमजी बिल्डरच्या इमारतीत राहतात. संपूर्ण प्लोअर त्यांच्या मालकीचा आहे. याची किंमत ५ कोटी रुपये आहे. 


शिवाय भदाणे यांची मालकीची अनेक दुकाने इतर ठिकाणी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लाचलुचपत खात्याच्या पथकामार्फत त्यांच्या घराची तपासणी सुरु आहे.