ठाणे : ठाण्यातील ठाणे आणि कळवामध्ये लोकलमधून दोन प्रवाशी पडल्याची घटना नुकतीच घडली आहे. सीएसएमटीकडे जाणाऱ्या या लोकलमध्ये प्रचंड गर्दी होती. त्यामुळेच हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाविरोधात संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चालत्या रेल्वेतून दोन प्रवासी पडल्याची घटना सकाळी घडली. यातील एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या जखमी प्रवाशाला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. याआधी असे अनेक प्रकार घडले आहेत. 



गर्दी हे असे अपघात घडण्यामागचे कारण आहे. रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणे अथवा जास्त डब्ब्यांची गाड्या आणणे हे या प्रश्नांवरचे उपाय आहेत.


यासंदर्भात प्रवाशी संघटनांनी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे मागणी केली आहे. पण त्याकडे दुर्लक्षच झालेले पाहायला मिळते.


असे किती मृत्यू झाल्यानंतर रेल्वे प्रशासन सुविधा आणणार असा संतप्त प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत.