लोकलचे डबे घसरल्याने ट्रान्सहार्बर वाहतूक ठप्प
ठाणे-वाशी ही लोकल रुळावरून घसरल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे.
ठाणे : ठाणे-वाशी ही लोकल रुळावरून घसरल्यामुळे ट्रान्सहार्बर मार्गावरची लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. ठाणे-ऐरोली स्थानकादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या लोकलचे दोन डबे रुळावरून उतरले, पण पलटी झाले नाहीत, त्यामुळे सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
ठाण्याहून ऐरोलीच्या दिशेने जात असताना गणपती पाडा येथे लोकलचे डबे रुळावरून घसरले. रविवार असल्यामुळे चाकरमान्यांना त्रास झाला नाही आणि प्रवासीही कमी होते. तरी ठाण्याहून वाशीकडे आणि वाशीहून ठाण्याकडे जाणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहोचलं आहे आणि दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे.