ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूकीत सोमवारी पार पडली. 


राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेना एकत्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचा धनुष्याबाण हाती घेत पाठिंबा दिला. त्यात भाजपाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी शिवसेनेच्या मंजुषा जाधव तर, उपाध्यापदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. 


ठाण्यात नवं समीकरण


ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या नव्या समीकरणाची राजकिय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या 53 गटांसाठी 13 डिसेंबर रोजी मतदान झाले होते. जिल्हा परिषदेच्या 53 जागांपैकी 26 जागांवर शिवसेना, 16 जागांवर भाजप, 10 जागांवर राष्ट्रवादी आणि एका जागेवर कॉंग्रसने विजय मिळविला. 


भाजपला अपयश


जिल्हा परिषदेची सत्ता काबीज करण्यासाठी 27 हा जादुई आकडा गाठण्यासाठी सेनेला केवळ एका सदस्याची गरज होती. तर, दुसरीकडे भाजपने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची मोट बांधत जिल्हा परिषदेवर कमळ फुलविण्याचे मानसुबे आखण्यास सुरुवात केली होती मात्र यात भाजपला अपयश आल.