ठाणे : ठाण्यातील येऊर भागात मॉर्निग वॉकला गेलेल्या ठाणेकरांना एअरफोर्स बेस जवळ बिबट्याने डरकाळी फोडल्या सारखा आवाज आला. लोकांनी तातडीने वन विभागाला कळवल्यानंतर तात्काळ शोधा शोध केली असता २ दिवसांपूर्वीच जन्मलेल्या बिबट्याचे पिल्लू जीवाच्या आकांताने ओरडतं असल्याचं आढळलं. त्यामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचं समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये ही भीतीचं वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना सुखरूप उचलून नॅशनल पार्कच्या डॉक्टर टीमकडे सुपूर्त केलं. डॉक्टर या बछडयांवर उपचार करत आहेत.


औरंगाबादमध्ये देखील भरवस्तीत बिबट्या आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. ए वन परिसरातल्या काळ्या गणपती मंदिरामागे बिबट्या दिसून आला होता. जॉगिंग ट्रॅकच्या झाडीत बिबट्याचं अचानक दर्शन झाल्यानंतर. वनविभाग आणि पोलिसांकडून परिसरात शोधमोहीम सुरू केली. मात्र ऐन वस्तीत बिबट्याच्या दर्शन होत असल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली.