राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात चक्क बॅंक दरोड्यातील आरोपी
आरोपी थेट शरद पवार यांच्या भेटीला
पंढरपूर : मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबुत करण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात चक्क बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या ७८ लाख रुपयाच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याला सामील केल्याने पक्ष नेमका कसा मजबुत करायचाय असा प्रश्न नागरीक विचारु लागले आहेत.
सांगोला येथील बॅंक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेवून जाणारी व्हॅन १ नोव्हेंबर २०१७ ला पंढरपूर सांगोला रस्त्यावर खर्डी गावाजवळ लुटण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापक अमोल भोसले यानी हा बनाव रचला होता. या तपासात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष रामेश्वर मासाळ याचे नाव पुढे आले होते.
सध्या हा आरोपी जामिनावर बाहेर असताना मंगळवेढा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट शरद पवार यांच्या भेटीला जाताना असा दरोड्यातील आरोपी नेलाच कसा असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.