दिंडोरी जवळील जंगलात जनावरांना चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराखी नारायण गांगुर्डेना मुलीचा जोरात ओरडण्याचा आवाज आला. काहितरी गडबड आहे म्हणून गांगुर्डे त्या दिशेने गेले असता त्यांना धक्कादायक प्रकार दिसून आला. कोणीतरी येतय हे बघून मुलीसोबत असलेल्या एका इसमाने तिथून पळ काढला. गांगुर्डे यांना झाडावर मुलगी फास देण्याच्या अवस्थेत लटकलेली दिसली. त्यांनी तातडीने लहानग्या मुलीला खाली उतरवून ग्रामीण रुगणालयात भरती केले. या मुलीवर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु  असताना वडील सोबत होते.


याबाबत दिंडोरी पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेची चौकशी करत असताना दिंडोरी पोलिसांनी शाळेत जाऊन सुद्धा तपास केला. वडिलांना सुद्धा विचारपूस करण्यात आली. मात्र वडिलांकडून मिळालेले उत्तर संशयास्पद होती. अखेर वडिलाना दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतले असता धक्कादायक घटना समोर आली.


ही मुलगी देहरे वाडी गावची , तिच्या वडिलांनी पहिल्या पत्नीने नाकारल्यानं दुसर लग्न केलं होतं. मात्र मुलगी पहिल्या पत्नीची असल्याने घरात मोठ्या प्रमाणात वाद होऊ लागले होते. सावत्र आईला हि मुलगी नकोशी झाली होती.


यावरून संशयित आरोपी राम महादू धनगरे आणि त्याची पत्नी यांच्यात रोज भांडण होऊ लागले. राम महादू धनगरे याची दुसरी पत्नी सुद्धा त्याला सोडून गेल्यान त्याने अखेर मुलीला संपवण्याचा विचार केला.


मुलीला शाळेतून घरी घेऊन जाण्याच्या बहाण्याने राम ने तिला जंगलात नेले. आणि आयुष्यातील वाद संपविण्याचा निर्धार करत तिला फासावर लटकविले. यामध्ये मुलगी झटापट करत सुटका करून घेण्यासाठी आरडाओरडा करू लागली. आणि गुरख्याच्या लक्षात आल्याने या लहानग्या बालिकेची सुटका सुखरूप झाली. म्हणतात ना देवच धावून आला त्याचा प्रत्यय आज दिंडोरीत आला.