अलिबाग : होळीनंतर आलेला धुळवडीचा सण रायगड जिल्‍हयात मोठया उत्‍साहात साजरा करण्यात येतोय. यानिमित्‍ताने अलिबाग तालुक्‍यातील साखर कोळीवाडा इथे कोळी समाजातर्फे वल्हवायच्‍या पारपांरिक होड्या चालवण्‍याची स्‍पर्धां आयोजित करण्‍यात आली. 


कोळी समाजाची मूळ परंपरा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांत्रिकीकरणाच्‍या जमान्‍यात पारंपारिक होडया अडगळीत पडल्‍या आहेत . अशावेळी कोळी समाजाची मूळ परंपरा टिकून रहावी, नव्‍या पिढीला याची माहिती मिळावी या हेतूने या स्‍पर्धेचे आयोजन केलं जातं. 


 १०० स्‍पर्धकांचा सहभाग


जवळपास १०० स्‍पर्धकांनी या स्‍पर्धेत भाग घेतला. गेले महिनाभर स्‍पर्धक याचा सराव करत होते.  या स्‍पर्धा पाहण्‍यासाठी नागरिकांनी मोठया प्रमाणावर गर्दी केली होती.