मुंबई : पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनरला कारनं धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात ७ जण जखमी झाले. एक्स्प्रेस वेवरुन पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या कारची समोरुन येणाऱ्या कंटेनरला धडक बसल्याने हा अपघात झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धडक मारलेल्या गाडीमध्ये सात प्रवासी होते. यामध्ये किरकोळरित्या जखमींना लोणावळ्यामधील यश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यातील एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर मार लागल्याने त्यांना पनवेलमध्ये रवाना करण्यात आले आहे. 


दरम्यान जखमी झालेले प्रवासी नाशिकमधील घोटी गावातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर आयआरबीचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच जखमींच्या नातेवाईकांशी संपर्क करुन त्यांना याबाबतची माहितीही देण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातात कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.