नाशिक : एक रुपयाचे नाणे गिळल्याने, फुगा गिळल्याने, हरभरा घशात अडकल्याने, झोक्याचा फास लागून मृत्यू. या काही मृत्यूच्या घटना चटका लावून जातात. अशीच एक घटना पुन्हा घडलेय. चिमुकला आपल्या बाबांना टाटा करायला आला आणि तो त्याचा टाटा अखेरचा ठरला. गेल्या काही दिवसांत नाशिकमध्ये चटका लावणाऱ्या घटना घडल्याने पालकांनो, कृपया डोळ्यात तेल घालून आपल्या मुलांकडे लक्ष ठेवा, हेच सांगणे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक चिमुकला त्याच्या वडिलांना टाटा करायला गेला आणि तो टाटा त्याचा शेवटचाच ठरला. मुलांकडे नीट लक्ष न दिल्याने नाशिकमध्ये आणखी एका चिमुकल्याचा चटका लावणारा मृत्यू झाला आहे. अंशुमन. अवघ्या साडे तीन वर्षांचा. नाशिकच्या अंबड परिसरातल्या शिरीन हाईट्स या इमारतीत दोन महिन्यांपूर्वी शर्मा कुटुंबीय राहायला आले होते. वडील ऑफिसला जाताना अंशुमन त्यांना सज्जामधून टाटा करायचा. सोमवारी अंमशुमन त्याच्या वडिलांना टाटा करताना त्याचा तोल गेला आणि तो तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळला, त्यातच त्याचा मृत्यू झाला. 


अंशुमन खाली कोसळला. त्यावेळी त्याची आई घरात काम करत होती. सज्जाला ग्रीलही नव्हते. आणखी धक्कादायक म्हणजे अंशुमन खाली पडलेला त्याच्या आईला समजलेही नाही.