सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सातारा येथील रयत शिक्षण संस्थेत पत्रकार परिषद सुरु असताना कार्यकर्त्याची ये जा सुरु असताना दरवाजा लॉक झाला. अन् शरद पवार यांच्यासह पत्रकार अर्धा तास आतमध्ये अडकून राहिले. प्रत्येक संकटावर यशस्वी मात करणारे शरद पवार यानी दरवाज तोडण्यासाठी स्वत: मदत केली. सातारचा मजबूत राजेशाहीचा दरवाजा तोडणे सोपे नाही, अशी कोपरखळी शरद पवार यानी पत्रकाराना लगावली. शेवटी अर्धा तासानंतर दरवाजा तोडून सर्वजण बाहेर पडले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा येथे आज पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ५९ वी पुण्यतिथी होती. यानिमित्त माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी साताऱ्यातील कर्मवीरांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अजित पवार, रामराजे नाईक निंबाळकर, खासदार सुप्रिया सुळे, एन डी पाटील आदी उपस्थित होते.


शरद पवार यांची पत्ररकार परिषद