निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड: सकाळी सकाळी आपल्याला चहा हा लागतोच. गरमगरम चहा आणि त्यासोबत खारी बिस्किट खाल्याशिवाय आपला दिवस पुर्ण होत नाही. परंतु जर का तुम्ही कुठेतरी चहाच्या टपरीत बसला असला आणि मग अचानक तुमच्या टपरीत मोठा ट्रक घुसला तर तुम्ही काय कराल? हो, असं होऊ शकतं कारण असाच काहीसा प्रकार सध्या नांदगाव येथे घडला आहे. चक्क सकाळी सकाळी एका चहाच्या टपरीत डंपर ट्रक घुसला आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ माजली आहे. या घडल्या प्रकारामुळे तरी कोणाला जीवितहानी झालेली नाही. त्यामुळे चहा प्यायला आलेली लोकं थोडक्यात बचावली आहे. (
The dumper broke the two-feet high pavement on the side of the road and entered the tea shed)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नांदगाव रोडवरील पानेवाडी शिवारातील हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन आयल गॅस कंपनी समोर नांदगांवकडून मनमाडकडे भरधाव वेगाने मुरमाने भरलेला डंपर रस्त्याच्या कडेचा दोन फूट उंच फुटपाथ तोडून चहाच्या टपरीत घुसला. सुदैवाने टपरीवर उभे असलेले ग्राहक बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला मात्र चहा टपरी पूर्णपणे चक्काचूर कंपनीच्या दोन्ही बाजूने वाहने राहत असल्याने चालकांचे नियंत्रण सुटते त्यातून अपघात होत असतात. त्यामुळे कंपनीसमोरील बेकायदा उभ्या राहणाऱ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. 


या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत हा डंपर ट्रक अगदी फूटपाथवर येऊन आदळला आहे. त्यामुळे त्याच्या समोर असलेल्या चहाच्या टपरीत तो घुसला आहे. त्यामुळे लोकांची पळापळ सुरू झाली परंतु समोर येतानाचा ट्रक पाहून वेळीच तिकडचे नागरिक थोडक्यात बचावले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी हजेरी लावली आणि वेळीच घटनास्थळी भेट घेतली. या प्रकारात चहाच्या टपरीचे फारसे नुकसाना झालेले नाही. त्यामुळे ही घटना लगेचच आटोक्यात आली आणि परत चहाची टपरी व्यवस्थित सुरू झाली. 


हा ट्रक पुर्णपणे उलटा फूटपाथावर पडल्यामुळे सगळ्यांचीच त्रेधातिरपिट उडाली आहे त्यामुळे लोकांच्या जाण्यायेण्यातही खूप त्रुटी आल्या आहेत. सध्या अशा प्रकारच्या घटना या ठिकाणी फार जास्त घडताना दिसत आहे. मध्यंतरीही अशाप्रकारे ट्रक नाहीकर ट्रॅक्टर घुसण्याचे प्रकार सुरू झाले होते. त्यातून रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुकानांचेही खूप नुकसानही झाले होते. कधीकधी शाळ्यांच्या आवरात तर कधी हॉस्पिटलमध्येही असे प्रकार झाल्याचे समोर आलेले होते. त्यामुळे तेव्हाही लोकांना त्रास सहन करावा लागला होता. सध्या या प्रकारांना आळा घालणं महत्त्वाचे ठरले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर यासाठी प्रयत्न होणे म्हत्त्वाचे आहे.