BRS Mission Maharashtra : तेलंगाणाचं अख्ख मंत्रिमंडळ 27 जून रोजी पंढरपुरात येणार आहे. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव  (Telangana Chief Minister K. Chandrasekhar Rao) आणि त्यांचे सहकारी विठट्ठलाचं दर्शन घेणार आहेत. तसंच विठ्ठूरायाच्या दर्शनानंतर तुळजाभवानीचंही दर्शन घेण्यासाठी केसीआर आणि नेतेमंडळी जातील अशी माहिती बीआरएसचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी दिली आहे. 


अजित पवार म्हणालेत बीआरएस, वंचितकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या रौप्यमहोत्सवी मेळाव्यातून अजित पवारांनी पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचे कान टोचले. काही माजी मंत्री आहेत जे आपल्या जिल्ह्यातून आमदार निवडून आणू शकत नाहीत असा टोला अजित पवारांनी लगावला. त्याचवेळी बीआरएस, वंचितकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही असंही अजित पवारांनी म्हटलं होते.  


बीआरएसच्या एन्ट्रीवरून संजय राऊतांची टीका


महाराष्ट्रात बीआरएसच्या एन्ट्रीवरून संजय राऊतांनी टीका केली. बीआरएस पक्षाच्या केसीआर यांना भाजपने महाराष्ट्रात आणल आहे. भाजप इतर पक्षांचा वापर करतंय, मनसे, एमआयएमचाही भाजपने वापर केल्याची टीका राऊतांनी केली होती. तर,  बीआरएस सारख्या दुकांनाना महाराष्ट्रात संधी नाही, असा इशाराच काँग्रेस नेते पटोलेंनी दिला आहे.


सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश


आपल्या अदांनी घायाळ करणा-या लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी 21 जून रोजी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठ देत BRSमध्ये प्रवेश केला. 2021मध्ये सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही सहका-यांसोबत प्रवेश केला होता. आता त्यांनी राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी देत हैदराबादमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी राव यांच्या BRS पक्षात प्रवेश केला. 


संभीजनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीत BRSचा उमेदवार विजयी 


संभीजनगरमधील ग्रामपंचायत निवडणुकीतून BRSनं महाराष्ट्रात खातं उघडल आहे. गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ ग्रामपंचायतीमध्ये BRSचा उमेदवार विजयी झाला. गफूर सत्तार पठाण 115 मतांनी विजयी झाले आहेत. BRS अर्थात भारत राष्ट्र समिती हा तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे. गेल्या काही दिवसांपासून केसीआर सातत्यानं महाराष्ट्रात सभा घेतायेत. या निवडणुकीच्या निमित्तानं BRSचा महाराष्ट्रात प्रवेश झाला.  मराठवाड्याच्या मार्गानं KCR यांचा BRS पक्ष महाराष्ट्रात प्रवेश करतोय. राज्यभरात अनेक ठिकाणी पक्ष कार्यलय सुरु करत BRS पक्ष महाराष्ट्रात हात पाय पसरत आहे.