टिटवाळा लोकलचा पहिला डबा रुळावरून घसरला; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
लोकलचा पहिला डबा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. हजारो प्रवासी अडकून पडले आहेत.
Mumbai Local Train Problem : मध्य रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल रुळावरून घसरली आहे. टिटवाळा लोकलचा पहिला डबा रुळावरून घसरला आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. धीम्या मार्गावरील सर्व लोकल खोळंबल्या आहेत. मुंब्रा रेल्वे स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली आहे. रेल्वेचे अधिकारी आणि कर्मचारी लोकलसेवा पुन्हा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहेत.