सोनू भिडे, नाशिक - भारतीय संस्कृती, धार्मिक स्थळ आणि ऐतिहासिक स्थळांना जोडण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने “भारत गौरव” अंतर्गत खाजगी रेल्वे चालविण्याची घोषणा २०२१ साली केली होती. या योजने अंतर्गत धार्मिक स्थळांमध्ये महाराष्ट्रातील  शिर्डीचा समवेश करण्यात आल्यानं पहिली खाजगी रेल्वे कोयंम्बतूर – साईनगर- कोयंम्बतूर दरम्यान धावली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

“भारत गौरव” अंतर्गत पहिली खाजगी रेल्वे चालविण्याचा मान दक्षिण भारताला मिळाला आहे. कोयंम्बतूर येथून १४ जून ला पहिल्या खाजगी रेल्वेला हिरवा झेंडा दाखवत रवाना करण्यात आले आहे. हि रेल्वे कोयंम्बतूर येथून मंगळवारी (१४ जून) ला सायंकाळी ६ वाजता निघाली होती गुरुवारी (१६ जून) सकाळी ७.३० वजता हि रेल्वे शिर्डीच्या साईनगर येथे पोहचली. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवारी कोयंम्बतूर कडे रवाना होणार आहे.


साउथ स्टार रेल नावाच्या खाजगी कंपनीला दोन वर्ष्याकरिता हि रेल्वे लीज वर देण्यात आली आहे. या गाडीची देखभाल खाजगी कंपनीच करणार आहे. या कंपनीकडून सुरक्षा अनामत रक्कम म्हणून एक कोटी रुपये घेण्यात आल्याच म्हटल जात आहे.


कसा असेल खाजगी रेल्वेचा प्रवास


हि रेल्वे महिन्यातून तीन वेळा धावेल. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता कोयंम्बतूर नॉर्थ येथून सुरु होऊन. गुरुवारी सकाळी ७.३० वाजता शिर्डीला पोहोचणार आहे. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी शिर्डी येथून रवाना होऊन शनिवारी १२ वाजता पुन्हा कोयंम्बतूर पोहचेल. कोयंबतूर ते शिर्डी हा प्रवास ३८ तासांचा असणार आहे. प्रवासातील धर्मिक स्थळाच्या ठिकाणी हि रेल्वे थांबणार आहे. कोयंबतूर येथून निघाल्यानंतर तीरुपूर, इरोड, सेलम जोलारपेठ, बेंगलुर, येलहंका, धर्मावरम, मंत्रालय रोड आणि वाडी मार्गे शिर्डीला पोहोचणार आहे.


रेल्वेत काय असणाऱ्या सुविधा


1AC एक कोच, 2AC दोन कोच, 3AC आठ कोच, तर स्लीपर पाच कोच आहेत. एकावेळी १५०० प्रवासी प्रवास करू शकणार शकतील. यात एक स्वीपर, सुद्धा असणार आहे जो वेळोवेळी साफसफाई करेल. तसेच एक डॉक्टर, अग्निशमन, सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षा रक्षक तसेच रेल्वे पोलीस सुद्धा असणार आहे.


किती असेल प्रवास भाडे


या रेल्वेत प्रवास करण्यासाठी दोन प्रकारची भाडे आकारणी केली जाणार आहे. पर्यटक रेल्वे तिकीट घेऊ शकता किंवा पॅकेज ची निवड करू शकतात. रेल्वे तिकीट हे नियमित रेल्वे तिकिटाच्या बरोबर आहे. स्लीपर २५०० रुपये, थर्ड एसी ५००० रुपये, सेकंड एसी ७००० रुपये, आणि फर्स्ट एसी १०००० रुपये आहे. तर पॅकेजचे दर अनुक्रमे ४९९९, ७९९९, ९९९९,१२९९९ रुपये आकारले जाणार आहे. ज्या पर्यटकांनी पॅकेजची निवड केलीय त्यांना जाण्या येण्याचे रेल्वेचे भाडे, सोबत व्हीआयपी दर्शन, बस व्यवस्था, वातानुकुलीत निवास, गाईड प्रावास विमा दिला जाणार आहे.


दक्षिण भारतात सईबाबांचा भक्त गण मोठ्या प्रमाणात आहे. दर वर्षी लाखो भाविक शिर्डीला बाबांच्या दर्शनाला येत असतात. सध्या विमान कंपन्यांना होणारा फायदा बघता शिर्डीत किती फायदा आहे हे कंपनीने नेमके हेरले. बक्कळ फायदा मिळवून देणारी ही एक्सप्रेस ठरू शकते हे खाजगी कंपनीच्या लक्षात आले. मात्र इतके वर्ष रेल्वेच्या गले लठ्ठ पगार घेणाऱ्या सरकारी प्रशासनाला हे का समजले नाही हा प्रश्न आहे.