नवी मुंबई : अश्विनी बिद्रे प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी चौथा आरोपी अटक करून, या प्रकणाचा तपासाचा वेग वाढला आहे. चौथा आरोपी गजाआड झाल्याने अभय कुरुंदकरच्या अडचणी वाढल्या आहेत. 


जवळचा बालपणीचा मित्र


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाकूड कापण्याचे कटर मशीन  शोध घेण्यासाठी पोलिसांनी हा चोथा आरोपी अटक केला असून,  महेश फळणीकर हा अभय कुरुंदकर याचा जवळचा बालपणीचा मित्र असून, तो कुरुंदकर यांचे सर्व व्यवहार महेश पाहत होता. त्याला पुण्याच्या कात्रज परिसरातून सोमवारी  अटक केली.


तपास क्राइम ब्रँचकडे देण्याची मागणी


ड्रायव्हर कुंदन पाठोपाठ झालेल्या  या चवथ्या आरोपीला अटक झाल्याने अभय कुरुंदकर आणि राजेश पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत, या प्रकरणाचा तपास या आधी सुरुवातीला क्राइम ब्रँचकडे देण्याची मागणी अश्विनीच्या कुटुंबाने केली होती. परंतु नवी मुंबई  पोलीस आयुक्तांनी याची दखल घेतली नाही. याचा तपास गुन्हे शाखेकडे गेल्यावर इतर आरोपीसमोर आले असल्याचा दावा अश्विनी बिद्रेचे पती राजू गोरे यांनी केला आहे.