कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : ग्रामीण भागातील जनता ही त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेत असतात. काही कामे फार पूर्वीपासून रखडलेली असतात त्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणे आवश्यक असते. (The general public will no longer be able to meet the Chief Minister directly in the office of Chief Minister Eknath Shinde nz)


हे ही वाचा - हर हर महादेव सिनेमाचा विशेष शो, मंत्रीमंडळातील सदस्य हजर रहाणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 


सामान्य नागरिकांना जवळून प्रशासन अनुभवता यावे म्हणून विभागीय मुख्यमंत्री सचिवालयाचे कामकाज अधिक गतिमान करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिले आहेत. नागरिकांनी आपल्या तक्रारी, निवेदने आणि अर्ज विभागीय मुख्यमंत्री सचिवालयात सादर करता यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.


हे ही वाचा - महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका सर्वदूर फडकू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील कार्यालयामध्ये आता सामान्य जनता थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकणार नाही. सुरुवातीला सर्वसामान्य जनतेला भेटणारे मुख्यमंत्री आता मात्र जनतेला दोन हात लांब ठेवण्याच्या प्रयत्नात दिसून येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयातील कार्यालयात VVIP , आमदार, खासदार सोडून आम जनता, पत्रकार यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली दिसून येत आहे. मंत्रालयात सामान्य माणसाची निवेदने स्वीकारण्यासाठी आणि त्याचा पाठपुरावा करण्यासाठी तळ मजल्यावर टपाल कक्ष स्थापन करण्यात आलेलं आहे. तसेच सूचना फलक मुख्यमंत्री कार्याल्यासमोर लावण्यात आलेले पाहायला मिळत आहे.