Satara Thoseghar Waterfall : साताऱ्यातील  ठोसेघर धबधब्याकडे जाणारा घाटरस्ता खचला आहे. तर बोरणे गावाजवळ खूप मोठ्या प्रमाणात हा रस्ता खचल्याने हा घाटरस्ता वाहतूकीसाठी धोकादायक बनला आहे.  मात्र तरीही पर्यटकांची या रस्त्यावरून अद्याप वाहतूक सुरुयं. धोकादायकरित्या अनेक लोक या घाटातून प्रवास करतायत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून धोकादायक आशयाचे फलक देखील येथे लावण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे, या घाट रस्त्यासह येथे दरडी ही कोसळल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रस्ता खचण्यासह साताऱ्यातून ठोसेघर धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहेत. सातारा शहर आणि ग्रामीण भागाला जोडणाऱ्या या जुन्या बोगदा परिसरात वारंवार दरड कोसळते.  डोंगरातील मोठे दगड रस्त्यावर आल्याने काही काळासाठी वाहतूक ठप्प होतेय. 


निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण असलेल्या सातारा जिल्ह्यातील ठोसेघर धबधबा वाहू लागला आहे. पावसाळ्यामुळे तब्बल 1500 फुटावरून कोसळणारा हा ठोसेघर धबधबा पाहण्या साठी राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे गर्दी करत आहेत. 


महाबळेश्वरमधील तापोळा-देवळी रोडवर पुलावर भला मोठा खड्डा


साता-याच्या महाबळेश्वरमधील तापोळा-देवळी रोडवर पुलाला अचानक भला मोठा खड्डा पडल्याने, कार खड्ड्यात अडकली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर जेसीबीच्या सहाय्यानं, या खड्ड्यात अडकलेल्या कारला बाहेर काढण्यात आल. या पुलावरून मुंबईच्या दिशेने ही कार जात होती. मात्र कार पुलावर येताच पुलाला मोठा खड्डा पडला.


सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट 


सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.जिल्ह्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कोयना,कण्हेर धरणानांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.कण्हेर धरणातून 5 हजार क्युसेक विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे माहुली येथील कैलाश स्मशान भूमी तील अग्निकुंड पाण्याखाली गेली आहेत. कोयना धरणातून देखील विसर्ग वाढवण्यात आला आहे.