नाशिकमधील कॅथेड्रलचे उद्घाटन
नाताळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कॅथेड्रलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील महत्वाच्या कॅथेड्रल पैकी हे एक आहे.
नाशिक : नाताळाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील कॅथलिक धर्मप्रांताच्या नव्याने बांधण्यात आलेल्या कॅथेड्रलचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्रातील महत्वाच्या कॅथेड्रल पैकी हे एक आहे.
नाशिकच्या महसुली विभागातील पाच जिल्हे मिळून एक धर्मप्रांत आहे. त्याअंतर्गत येणाऱ्या जवळपास ३५ चर्चच्या कामकाजावर कॅथेड्रल देखरेख असते. स्वातंत्र्य पूर्व काळापासून पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र मिळून केवळ पुणे हा धर्मप्रांत होता.
१९८७ साली पोप जॉन पॉल दुसरे यांच्या कारकिर्दीत नाशिक धर्म प्रांताची स्थापना करणायत आली. तेव्हापासून नाशिकमध्ये कॅथेड्रल असावे अशी अपेक्षा व्यक्त होत होती ती या वर्षी पूर्ण झालीय. नवीन कॅथेड्रलच्या इमारतीचे बांधकाम ३५ हजार चौरस फुटांचे आहे. चर्चच्या दर्शनी भागावर येशू ख्रिस्ताचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय.