चिमुकल्याने खेळण्यातील बंदुकीतील स्प्रिंग गिळली
भिवंडीतील सात वर्षीय मुलाने खेळण्यातील बंदूक उघडून आतील स्टीलची स्प्रिंग गिळली.
ठाणे : भिवंडीतील सात वर्षीय हर्ष केणी या मुलाने खेळण्यातील बंदूक उघडून आतील स्टीलची स्प्रिंग गिळली. या विचित्र स्थितीतून लहानग्या हर्षची ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर ह्रषिकेश वैद्य यांनी सुटका केलीये. हर्षच्या फुफ्फुसात अडकलेली दीड सेंटीमीटर आकाराची स्प्रिंग कोणत्याही शस्त्रक्रियेविना काढण्याचा यशस्वी प्रयोग होरायझन रुग्णालयातर्फे डॉ. ह्रषिकेश वैद्य यांनी केल्याने पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. मुलाची प्रकृती स्थिर असून उपचारानंतर त्याला घरी पाठवण्यात आले आहे. मात्र या घटनेने लहानग्यांकडे पालकांनी बारीक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट झाले आहे.