राज्यात थंडीचा कडाका वाढतोय, पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद
महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra) दोन दिवसांपासून थंडीला (Cold) सुरुवात झाली आहे.
मुंबई : महाराष्ट्र राज्यात ( Maharashtra) दोन दिवसांपासून थंडीला (Cold) चांगलीच सुरुवात झाली आहे. पहाटे पहाटे हवेत गारवा जाणवत आहे. गेले दोन दिवस तापमानात घट (Temperature) होताना दिसून येत आहे. आज दुसऱ्या दिवशी तापमानात लक्षणीय घट झालेली दिसून येत आहे. पुणे (Pune) आणि नाशिक, (Nashik) जळगावात (Jalgaon) तापमान (Temperature) सर्वाधिक कमी तापमान असल्याची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात काही ठिकाणी किमान तापमान १० अंशाच्या आसपास राहिले आहे. त्यामुळे राज्यात थंडीची चाहूल दिसून येत आहे. अनेक ठिकाणी हवेत गारवा जाणवत असून झोंबणारा गारवा जाणवत आहे. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी तापमान मोठी घट झाली असून पुण्यात ९.८ तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये १०.४ तर जळगावात १०.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
मुंबई, नवी मुंबई, ठाणे या शहरातही तापमानात घट झाली आहे. सांताक्रुझ येथे १९.८ अंश सेल्सिअस, डहाणू १८.८ अंश, बारामती ११.९ अंश, औरंगाबाद १२.८, परभणी १३ अंश सेल्सिअ, चंद्रपूरमध्ये ११.२ अंश तर यवतमाळ येथे ११.५ आणि नागपूर येथे १८.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले आहे.
परभणीत तापमानात घट
परभणीचा पारा सलग आठ दिवस घसरून ८ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला आहे. काल दिवसभर हुडहुडी भरावी अशी थंडी जाणवत होती. आजच तापमान ११.४ अंश सेल्सिअस जाऊन पोहोचल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाने दिली. वातावरणात ही चांगलाच गारठा जाणवत आहे.
निफाडचा पारा घसरला
नाशिकच्या निफाड तालुक्याचा किमान पारा घसरल्याने थंडीचा चांगलाच कडाका वाढला आहे. निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान विभागात ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची राज्यातील निच्चांकी नोंद झाली आहे. वातावरणात दररोज बद्दल होत असल्याने उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे ८.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद कुंदेवाडी येथे झाली आहे. हवेतील गारव्यामुळे निफाड ,लासलगाव, पिंपळगाव बसवंत, ओझर, सायखेडा, चांदोरी गारठून निघाले आहेत.
धुळ्यात थंडीचा कडाका
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका वाढताच गरम कपड्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. स्वेटर्स, मफलर्स, कानटोप्या आणि लहान मुलांसाठी गरम कपड्यांना विशेष मागणी बाजारपेठेत दिसून येत आहे. थंडी वाढल्या बरोबर विक्रेत्यांनीही गरम कपड्यांच्या किमतींमध्ये वाढ केल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळे आण नंदुरबार जिल्ह्यात १० ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाची नोंद झालेली आहे.