Maharashtra Rain : दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर बाप्पाच्या निरोपाची वेळ आली आहे. अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई पुण्यासह देशभरातही विविध ठिकाणी विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. भक्तांना पावसात भिजतच  गणेश विसर्जन करावे लागणार आहे. पावासाबाबत हवामान खात्याने अत्यंत महत्वाचा अलर्ट दिला आहे. अनेक भागात जोरदार पाऊस पडणार आहे.  


पुढील 24 तास महत्वाचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हवामान विभागाने पावासाचा अंदाज वर्तवला आहे.  पुढील 24 तास महत्वाचे असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.  मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, कर्नाटक गोवा आणि केरळ किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. 


पावसाची दमदार बॅटिंग


पुढील 24 तासांत राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या ते जोरदार सरी बरसण्याचा अंदाज आहे. ऑगस्टमध्ये दडी मारून बसलेल्या पावसानं सप्टेंबरमध्ये चांगली हजेरी लावल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांत कोकण, मराठवाडा आणि विदर्भात पावसानं दमदार हजेरी लावलीय. त्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान विभागानं जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय.


मुंबईत गणेश विसर्जानाची धुम


मुंबईत गणेश विसर्जनाची धुम पहायला मिळाला आहे. लालबागचा राजा, मुंबईचा राजा तसेच मुंबईचा महाराजा यासह मुंबईतील अनेक मोठे गणपती विसर्जनासाठी निघाले आहेत. 


पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू 


पुण्यात मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूक सुरू झालीय. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग गणपती आणि गुरुजी तालीमचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत. मानाच्या गणपतींची मिरवणूक हा देखणा सोहळा असतो.... ढोल-ताशांच्या गजरात मानाच्या गणपतींना निरोप दिला जातो.