Maharashtra  Popti : महाराष्ट्र हे देशभरातील पर्यटकांचे आवडते डेस्टिनेशन आहे.  ऐतिहासिक वारसा लाभलेल्या महाराष्ट्राची खाद्य संसक्ती देखील तितीकच लोकप्रिय आहे. मोदक, पुरणपोळी, मिसळ, मासवडी, तांबडा पांढरा रस्सा, ठेचा हे पदार्थ जगप्रसिद्ध आहेत.  महाष्ट्रात एक असा पदार्थ आहे दो फक्त हिवाळ्यातच बनवला जातो.  विशेष म्हणजे हा पदार्थ व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही लोक खाऊ शकतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिवाळ्यात बनवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील या लोकप्रिय पदार्थाचे नाव आहे पोपटी. हिवाळा सुरु झाला की गावाकडे शेतशिवारात पोपटी बनवण्याचा बेत आखला जातो. मुंबईतील अनेक मंडळी पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून गावाला जातात. पोपटीची चव ही अप्रतिम असते. 


पोपटी हा कोकणातील खास करुन  रायगड जिल्हाच्या संस्कृतीतील एक लोकप्रिय प्रकार आहे. वालाच्या शेंगा या भांबुर्डीच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजविण्यात येतात. त्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात.  हिरव्यागार भाज्यांमुळे याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी असे म्हटले जाते.


विदर्भ आणि खानदेशामध्ये ज्वारी आणि बाजरीची कणसे भाजून हुर्डा तयार केला जातो. थंडीच्या दिवसात इथे हुर्डा पार्ट्या चालतात. त्याचप्रमाणे कोकणात गावठी वालाच्या शेंगांची पोपटी ही अत्यंत प्रसिद्ध आहे. व्हेज पोपटीसह सध्या मांसाहारी पोपटी अधिक प्रमाणात खाल्ली जाते. भाजीपाल्यासह यामध्ये अंडी, चिकन घालून या पोपटीचा स्वाद अधिक वाढवला जातो. शेतात अथवा शेताबाहेर पोपटी पार्टी केली जाते. थंडीत पोपटीची चव चाखण्याची मजा काही औरचं.   पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहातो. 


कोकण स्टाईल शाकाहारी पोपटी, गावरान चिकन पोपटी आणि झणकेदार नागपुरी पोपटी हे 3 प्रकार प्रामुख्याने सर्वाधिक लोप्रिय आहेत. मडक्याच्या तळाशी सर्वात आधी भांबुर्डीच्या पाल्याचा व्यवस्थित थर शेंगा, कांदे, बटाट्याचा थर, वांगीचे तुकडे तसेच खोबरं, तिखट, गोडा मसाला, ओवा आणि मीठ टाकून थरावर थर लावले जातात. त्यानंतर मडक्याचे तोंड भांबुर्डीच्या पाल्यानेच बंद करुन हे मडक शेकोटीत ठेवून बाजले जाते. अशाच प्रकारे चिकन तसेच अंडी घालून नॉनव्हेज पोपटी बनवली जाते.