नागपूर : मुंबई मेट्रोचे उद्या लोकार्पण होतंय ही आनंदाची बाब आहे. मेट्रो लोकांच्या सेवेत येतंय. यात श्रेय वादाची लढाई नाही. पण, सरकारला अपश्रेय येऊ नये असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलाबा ( Colaba ) ते sipz हा मोठा मार्ग आहे. पण, कारशेड न मिळाळ्यामुळे पुढे चार वर्ष ही लेन सुरु होणार नाही. त्यामुळे आरे ( aarey ) येथे कारशेड उभारली तर ही मेट्रो ९ महिन्यात सुरु होईल. त्यामुळे राज्य सरकारने प्रयत्न करून अरे येथे कारशेड उभारावे अन्यथा श्रेय घेता घेता अपश्रेय येईल असा टोला त्यांनी लगावला.


राष्ट्रवादी (NCP ), काँग्रेस ( Congress ), शिवसेना ( Shivsena ) यांच्यामध्ये सध्या अल्पसंख्यांकांची मते मिळविण्यासाठी चढाओढ सुरु आहे. त्यामुळे काही निर्णय घेतले जात आहेत. मात्र, यामुळे अल्पसंख्याकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


वकील सतीश उके ( Adv. Satish Uke ) यांच्यावर जी कारवाई झाली आहे. ती एका जमिनीच्या प्रकरणात झाली आहे. यासंदर्भात नागपूर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे गेले. उके यांच्याविरोधात अनेक तक्रारी आणि एफआयआर दाखल आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.


२००५ पासून उके यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. वेगवेगळ्या न्यायाधीशांची तक्रार केल्याबद्दल त्यांच्यावर न्यायालयाने कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा का वाढविण्यात येऊ नये, असं म्हटलं होतं. आता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्याचे त्यांनी सांगितले.