पुणे : पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत. याप्रकरणी ऑडीओ क्लीप समोर आली असून पोलिसांनी अरुण राठोडला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. दरम्यान आता पूजाच्या आई वडीलांची बाजू समोर आली आहे. कोणतीही तक्रार नसल्याचा जबाब पूजाच्या आईवडिलांनी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूजाच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवण्यात आला. पूजाचे आईवडिल, बहिणीचा जबाब नोंदवण्यात आला. त्यात त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. पूजा सोरायसिस आजाराने त्रस्त होती, ती तणावात असायची. 


तिच्या गोळ्या सुरू होत्या. त्या गोळ्यांमुळेच चक्कर येऊन ती खाली पडली असावी असा जबाब तिच्या आईवडिलांनी दिलाय. पूजा चव्हाण प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार आहे. 



पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे हा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर होईल. दरम्यान संजय राठोड यांच्या नावाने तक्रार नसल्याने त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता धूसरच झालीय.


अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात


पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अरुण राठोड याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. अरुण राठोड याची पोलीस आयुक्तालयात चौकशी होण्याची शक्यता आहे.


पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात अरुण राठोडचा महत्वाचा भाग आहे. अरुण राठोडच्या नावाने व्हायरल रेकॉर्डिंगचा अहवालात उल्लेख आहे. यवतमाळ प्रकरणातही अरुण राठोड नामक व्यक्ती असल्यानं संशय बळावला आहे. या अहवालात विजय चव्हाणही सोबत असल्याचा उल्लेख आहे. 


वरिष्ठ पोलीस अधिकारी अरुण राठोडची चौकशी करणार आहेत. याप्रकरणी एकूण तीन पथक चौकशी काम करतायत. या अगोदर पूजाच्या आई वडिलांचा जबाबही घेण्यात आलीय. अद्यापही गुन्हा दाखल झाला नाही. आकस्मिक मृत्यूचीच नोंद झाली आहे.