Virar Crime News :  मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरारजवळ सापडलेल्या त्या सांगाड्याचा अखेर उलगडा झाला आहे. पोलिसांनी  मृताच्या पायातील काळ्या धाग्यावरुन  मारेकरी शोधला आहे. पोलिसांच्या या कागिरीचे कौतुक होत आहे. गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बाफाने ब्रिज जवळ अज्ञात मृतदह  सापडला होता. अखेर या मृतदेहाचा उलगडा झाला आहे.. गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी याप्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. देविदास उर्फ पक्या असं आरोपीचे नाव आहे. तर, लवेश माळी असं मृत व्यक्तीचे नाव आहे.


22 नोव्हेंबरला बाफाने ब्रिज जवळ लवेशचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला होता. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर मृतदेहाची अंडरवेअर आणि त्याच्या पायात बांधलेल्या काळ्या धाग्याचा तपास करून त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.


मृत लवेश माळी रिक्षा चालक म्हणून काम करायचा. रिक्षाचे केलेले नुकसान भरून देण्यावरून झालेल्या वादात आरोपी देविदास उर्फ पक्या याने त्याची हत्या केली होती. मृतदेह सापडल्यानंतर 72 तासांच्या आत गुन्हे शाखा दोनच्या पोलिसांनी आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. 


डोंबिवलीत हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद


डोंबिवली पूर्वेच्या वसंतवाडी गोग्रासवाडी परिसरात दिलु मली हा आईस्क्रिमचा विक्रेता आणि त्याचे सहकारी आईस्क्रीमचे स्टॉल लावतात. दिलू आणि त्याचे सहकार्य गाडीची साफसफाई करत असताना चार जणांचे टोळके रिक्षातून उतरले आणि त्यांनी हातातील तीक्ष्ण हत्याराने आणि लाकडी दांडक्यांनी त्याला आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यात तीक्ष्ण हत्याराने दिलु डोक्यात वार केल्याने त्याला गंभीर दुखापत झालीय. या प्रकरणी डोंबिवली टिळकनगर पोलिसांनी चार जणांना विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.


डोंबिवलीत हत्या करणाऱ्या दोघांना अटक


डोंबिवली सत्यवान चौक खाडीकिनारी सोमनाथ शिंदे या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. सोमवारी रात्रीच्या सुमारास सोमनाथच्याच मित्रांनी त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याची हत्या केली. हत्या झाल्याची माहिती डोंबिवली विष्णू नगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.या हत्ये प्रकरणी कोणताही पुरावा नसताना ही हत्या सोमनाथच्याच मित्रांनी केल्याचे पोलिसांनी शोधून काढले. सोमनाथचे मित्र योगेश डोंगरे ,विलन टावरे आणि दीपक करकडे यांनी हत्या केल्याचं तपासात समोर आले.पोलिसांनी आता दोघांना अटक केली असून एका आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.क्षुल्लक कारणावरून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.