मयुर निकम, झी 24 तास, बुलडाणा :  शेतमालाला अनेकदा उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळतो. शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य भाव मिळत नाही. दलाल, अडते, टेम्पो भाडे यामुळे शेतकऱ्याच्या हातात अवघे काही पैसेच येतात. शेतमालाला योग्य दर मिळत नाही, हे असं आपल्याला नेहमीचं ऐकायला मिळतं. शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी ठराविक आकडा ठरवलेला असतो. पण शेतकऱ्यांना त्यानुसार  पैसे मिळतातच, असं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर असतो. (The price of soybean at Khamgaon Agricultural Produce Market Committee 9 thousdand 500 per quintal)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


पण बुलडाण्यात याउलट चित्र पाहायला मिळालंय. सोयाबीनला उच्चांकी भाव मिळाला आहे.  त्यामुळे आवकही वाढली आहे. तसेच आपल्या मेहनतीला योग्य दर मिळत असल्याने शेतकरीही आनंदी झालाय.


विदर्भातील मोठ्या बाजार समित्यांपैकी एक असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत हमीभावाच्या दुप्पट दर सोयाबीनला मिळालाय. इथं सोयाबीनला तब्बल 9 हजार 675 रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळालाय. वाढती पशु खाद्याची मागणी आणि खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतीचा हा परिणाम असल्याचं जाणकार सांगताहेत. दर वाढल्यानं शेतकऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात माल आणायला सुरुवात केली आहे.