कुणाल जामदाडे, झी मीडिया, कोपरगाव: कमीत कमी वेळात साईंची सर्वात लहान पोर्ट्रेट रांगोळी (rangoli potrait) बनवून जागतिक विक्रम अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील मसुदा दारूवाला यांनी आपल्या नावे केला आहे. मसुदाच्या या सर्वात लहान रांगोळीची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्याचप्रमाणे सर्वात कमी वेळात लहान रांगोळीतून साईंची प्रतिमा बनवल्याबद्दल त्यांना एक्सक्लुझिव्ह वर्ल्ड रेकॉर्ड (world record), किंग्ज बुक ऑफ रेकॉर्डचे पुरस्कारही मिळाले आहे. 43 वर्षीय मसूदा या शिर्डी येथील संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षिका आहेत. (the smallest rangoli in kaporgav makes world record know more)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मसूदा दारूवाला यांनी पोर्ट्रेट रांगोळीमध्ये 40 मिनिटांत 2 सेमी बाय 2.5 सेमी जागेत साईंची प्रतिमा तयार केली आहे. यापूर्वीचा 5 सेमीचा जागतिक विक्रम मोडून मसूदाने सर्वात कमी जागेत पोर्ट्रेट रांगोळी काढण्याचा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. कोपरगावसारख्या ग्रामीण भागातून एवढ्या कमी जागेत रांगोळीत साईंची प्रतिमा (saibaba pratima) साकारून मसूदा यांनी विश्वविक्रम केल्याने यांच्यावर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 



शिर्डी - साईनगरीत अध्यात्मिक ऊर्जेची अनुभुती मिळाली 


जगतगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देवतीर्थ महाराज यांनी साईदरबारी हजेरी लावत साईबाबांचे (shirdi news) दर्शन घेत पाद्यपुजा केली. पुरी जगन्नाथ पिठाचे शंकराचार्य स्वामींनी बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दर्शन भ्रमण करत असताना महाराष्ट्र दर्शन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथून शिर्डीत येत शंकराचार्यांनी साईदर्शन घेतले शिर्डीत सिद्धपुरुष साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला आनंद मिळाला असुन अध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती झाल्याचे त्यांनी सांगितल आहे.