औरंगाबाद : अभ्यासक्रमात राज्यघटना हा विषय आता अनिवार्य करण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात घेण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून हा निर्णय लागू होणार आहे. पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही ठिकाणी हा विषय शिकवण्यात येणार आहे. विद्यापीठाशी संलग्न ४५० कॉलेजात हा राज्यघटना विषय अनिवार्य करण्यात आला आहे. संविधानाची विद्यार्थ्यांना जाणीव असावी त्याच्या अधिकाराची त्यांना जाणीव असावी, भारताचे संविधान कसा आहे त्यांना ही माहिती असावं यासाठी कुलगुरू डॉक्टर विजय येवले यांनी हा निर्णय घेतलेला आहे. भारतीय संविधान अभ्यासक्रमात सक्तीचा असणारे औरंगाबादचा विद्यापीठ देशातील पहिलं विद्यापीठ आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राज्यघटना हा विषय अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला परिषदेचे ४० सदस्य उपस्थित होते. कुलगुरू डॉ. येवले यांनी म्हटलं की, 'तरुण वयातच भारतीय संविधानाची ओळख होणे गरजेचं आहे. सर्वात मोठी राज्यघटना ही देशाची ओळख आहे. त्यामुळे हा निर्णय़ घेण्यात आला आहे.'


या ठरावाला बैठकीतील सदस्यांनी बहुमताने पाठिंबा दिला. त्यामुळे आता पदवीच्या अभ्यासक्रमात पहिल्या वर्षाला पर्यावरण, दुसऱ्या वर्षाला संगणकशास्त्र तर तिसऱ्या वर्षाला भारतीय संविधान हा विषय अनिवार्य करण्यात आला आहे.