Video : पाळणा तुटला आणि... बुलढाण्यातील यात्रेत घडली धक्कादायक घटना
हा पाळणा उंचावर फिरत असताना तो अचानक खाली आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा : बुलढाण्यात(Buldhana) धार्मिक कार्यक्रमानिमत्ताने भरवण्यात आलेल्या यात्रेत धक्कादायक घटना घडली आहे. पाळणा तुटल्याने(swing ride brok) या यात्रेत मोठी दुर्घटना घडली. यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाहा थरार व्हिडिओ
मेहकरच्या कंचनी महालाजवळील उर्स शरिफ अर्थात यात्रा भरवण्यात आली होती. या यात्रेत अनेक प्रकारचे उंच पाळणे लावण्यात आले आहेत. या यात्रेत नागरिकांची मोठी पहायला मिळत आहे. या यात्रेत काही महिला एका पाळण्यात बसल्या होता. यावेळी हा पाळणा उंचावर फिरत असताना तो अचानक खाली आपटल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
पाळणा जमीनीवर आपटल्यानंतर मोठा हादरा बसला. अचानक पाळणा तुटला आणि अपघात झाला. यात एक महिला गंभीर जखमी झाली असून तीच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाळणा कोसळल्यानंतर जत्रेत एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेनंतर जत्रेतील सर्व पाळणे बंद करण्यात आले आहेत. तसेच सर्व पाळण्यांची तपासणी देखील करण्यात आली.