अकोला : अकोल्यातील महाराष्ट्र बँकेच्या गांधी रोडवरील शाखेत काल ५ लाखांची चोरी झालीय. विशेष म्हणजे, बँकेतील अधिकारी व कर्मचार्यांना सायंकाळपर्यंत बँकेतून पाच लाख चोरी गेल्याचे सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान लक्षात आलेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार जणांच्या टोळीनं अवघ्या पाच मिनिटांत सकाळी ११ वाजता ही चोरी केलीय. सीसीटीव्ही कॅमेर्याच्या फुटेजमध्ये चोरट्यांचा हा प्रकार कैद झालाय. 


पोलिसांनी आता या प्रकरणाची चौकशी सुरू केलीय. बँक अधिकारी व कर्मचार्यांच्या निष्काळजीपणामुळे हा चोरीचा प्रकार घडल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहेय. यात कुणी बँकेतील कर्मचारी सहभागी आहेय काय?, याचाही पोलीस तपास करतायेत.