हेमंत चापुडे, झी मिडीया, पुणे: प्रचंड मेहनत, सहनशक्ती आणि त्यानंतर मिळणारं फळ हेच चित्र प्रत्येक शेतकऱ्यांचं आयुष्य सर्वांपुढे मांडत असतं. संपूर्ण जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही. शेतकऱ्यांविषयी लिहावं आणि बोलावं तितकं कमीच आहे. सध्या अचानकच शेतकऱ्यांचा मुद्दा पुन्हा प्रकाशात येण्याचं कारण म्हणजे जुन्नरमध्ये घडलेली एक घटना. जिथं प्रचंड मेहनतीनं उगवलेला आणि आता कुठे चांगली सोन्यासारखी किंमत मिळत असणारा सोयाबिनच चोरांनी लंपास केल्याची घटना घडली. (theives took tons of soyabeans farmer faced huge loss in junnar )


कुठे घडली ही घटना? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे जिल्ह्याच्या (Pune) जुन्नर तालुक्यातील (junnar rajur) राजुर येथे नगर कल्याण महामार्गलगत विनयशील कृषी फार्मर्स प्रोडूसर कंपनीच्या गोदामातून रात्री पत्रा उचकटून अज्ञात चोरट्यांनी तीन ते चार टन सोयाबीन लंपास केलं. आजच्या बाजारभावानुसार या सोयाबीनची किंमत जवळपास सुमारे दोन लाख रुपये असून इतक्या मोठ्या प्रमाणात या सोयाबिन गोणींची चोरी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची बाब समोर येत आहे. 


दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आळेफाटा पोलीस दाखल होऊन त्यांनी पंचनामा करत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास आळेफाटा पोलीस करत आहेत शेतीमाल चोरट्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळं सध्या नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.


हेसुद्धा पाहा : Video : पुणे बंद राहिलं बाजूला, सर्वत्र 'त्या' महिलेचीच चर्चा


 


राजुर येथे दहा 10 उच्चशिक्षित तरुणांनी एकत्रित येत विनयशील कृषी फार्म प्रोडूसर कंपनीची स्थापना केली या कंपनीच्या माध्यमातून हे तरुण शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल खरेदी करतात असाच शेतीमाल या तरुण व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता याच खरेदी केलेल्या सोयाबीनवर आता चोरट्याने डल्ला मारल्यामुळं यात या तरुण व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. 


सोयाबिनच्या 55 ते 60 गोणी पळवल्या 


मध्यरात्री चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत विनयशील या ट्रेडिंग कंपनीतून 55 ते 60 सोयाबीनच्या गोणींची चोरी केल्याने या नव्या तरुण व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच अतिवृष्टीच्या पावसाने एकीकडे शेतीमालाचे नुकसान झाल्याने सोयाबीन देखील शेतात खराब झाला होता त्यामुळे सोयाबिन चे बाजारभाव देखील काही प्रमाणात गडगडले होते. असं असताना या तरूण व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून मोठ्या आशेने सोयाबीनची खरेदी केली आणि पुढे पाठवून आपल्या नवीन ट्रेडिंग कंपनीला चांगला फायदा होईल अशी आशा नवतरुण व्यापाऱ्यांना होती मात्र यावरच  अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारल्याने त्यांच्यावर डोकं धरून बसण्याची वेळ आली आहे.