औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शनिवारी मुंबईत सभा झाली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी, 'मी तर संभाजीनगर बोलतो, मी संभाजीनगर म्हणतो म्हणजे झाले ना' असे विधान केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तर, रविवारी झालेल्या सभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवत 'ओ खैरे व्हा आता बहिरे' असे म्हणत माजी खासदार चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांची खिल्ली उडवली होती. 
 
मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात आता शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उडी घेतलीय. चंद्रकांत खैरे यांनी फडणवीस यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. संभाजीनगरचा मुद्दा घेऊन मी त्यांना वारंवार भेटलो, पण त्यांनी नामकरण केले नाही असा आरोप 
खैरे यांनी केला.


मुळात फडणवीस हे जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी संभाजीनगरसाठी काहीही केलेले नाही. केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला. त्याचा मी पाठपुरावा केला. पण, केंद्राने ते ही केले नाही. केवळ टाळ्या मिळवण्यासाठी अशी वक्तव्य करू नये, असा टोला खैरे यांनी लगावला. 


देवेंद्र फडणवीस मला बहिरे म्हणतात. आहो तुमचे नेतेच बहिरे झाले आहेत आधी त्यांना पहा, तुम्ही खोटं बोलताय फडणवीस, असे खैरे म्हणाले आहेत.