चंद्रपूर : चंद्रपुरात एका बोगस तृतीयपंथीयाची यथेच्छ धुलाई करण्यात आलीय. चंद्रपुरात एक बोगस तृतीयपंथी त्यांचा वेष परिधान करुन कमाई करत होता. याची माहिती मिळताच तेथील तृतीयपंथीयानी त्याची धुलाई केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. हा बोगस तृतीयपंथी वेष बदलून शहरातल्या भिवापूर परिसरात मातानगरमध्ये कमाई करताना आढळला. संताप अनावर झालेल्या तृतीयपंथीयांनी त्याला बॅटनंच धोपटलं. 


शहरात तृतीयपंथीयांची मोठी वस्ती आहे हे लक्षात येताच इथे काही बोगस तृतीयपंथीयांचा शिरकाव झालाय. दरम्यान, तृतीयपंथीयांसाठी काम करणा-या संबोधन ट्रस्ट संस्थेनं अशा बोगस तृतीयपंथीयांवर कारवाईची मागणी केलीय.