प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: आजपर्यंत तुम्ही गोशाळा, सर्पशाळा पाहिली असेल, पण भटक्या कुत्र्याची श्वान शाळा नक्कीच पहिली नसेल. आज तुम्हाला महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पहिल्या श्वान शाळा कुठं उभारली याची माहिती देणार आहोत. रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यासाठी श्वानशाळा  (Dog School) उभारली आहे. या श्वान शाळेत तब्बल 400 श्वान एकत्र राहणार आहेत. श्वनाना राहण्यासाठी सूसज्ज रूमही तयार करण्यात आली आहे. खाण्यासाठी श्वनाचे खाद्य तयार करण्यात आले असून आवश्यक लसीकरणही (Dog Vaccination) करण्यात येणार आहे. त्याच्या दिमतीला कर्मचारी वर्गही नेमला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खास भटक्या कुत्र्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील कणेरी मठावर उभारण्यात आलेली ही सुसज्ज शाळा आहे. आज पर्यत रस्त्यावर भटकायचं, मिळेल ते खायचे असा या कुत्र्याचा नित्यक्रम आपण पाहिला. पण आत्ता मात्र त्याच्या वाट्याला आलेलं हे जीवन बदललं आहे. दोन वेळच जेवण, अंगावर काही जखमा असतील किंवा एखादा कुत्रा आजारी असेल तर तात्काळ त्याच्यावर तज्ञ डॉक्टरांच्याकडून या शाळेत उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे काल पर्यत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या या श्वनाना अच्छे दिन आलेत. एकाच वेळी या श्वान शाळेत तब्बल 400 श्वनाना राहता येणार आहे. 


ही श्वान शाळा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज आणि सिद्धगिरी मठ याच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आली आहे. अशा प्रकारची राज्यातील न्हवे तर देशातील पहिली शाळा असल्याचा दावा करण्यात आला आहे. जगात विदेशी कुत्र्याचे लाड मोठ्या प्रमाणात पुरविले जातात पण देशी वाण असणाऱ्या भारतातील अनेक श्वान मात्र अन्न पाण्याविना भटकत असतात. त्याचा हाच खडतर प्रवास थांबवा यासाठी श्वान शाळेची संकल्पन अस्तित्वात आली आहे. सद्या या शाळेत भटक्या देशी श्वनाना प्राधान्य देण्यात आलं आहे.


सध्या मोकाट फिरणाऱ्या श्वानांचा प्रश्न हा गंभीर होत चालला (Street Dogs) आहे त्यामुळे यासाठी काहीतरी काळजी घेणे आवश्यक ठरते आहे यामुळे लोकांच्या सुरक्षेचाही प्रश्न मिटू शकतो. तेव्हा या उपक्रमाकडे एक चांगला उपक्रम म्हणून पाहता येऊ शकते. 


या श्वान शाळेत असणाऱ्या श्वनाना वेगळ्या जगाचा अनुभव येतो आहे त्यामुळे पाहिल्यादा शाळेत येताच थोडीशी बिथरलेली वाटत आहेत पण नंतर मात्र आपल्यालाही उत्तम जगण्याचा अधिकार आहे याची जाणीव या श्वानाना श्वान शाळेच्या निमित्ताने होईल अशी आशा नक्कीच करता येईल.