अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीमध्ये ३ तरुण पर्यटकांचा जीव गेल्यानंतर बंदी असलेल्या धारखोरा धबधब्यावर हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली. ना मास्क, ना फिजिकल डिस्टन, ना कोरोना संसर्गाची भीती असे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.अमरावती मधील तीन तरुण पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर धोकादायक धबधबा म्हणून बंदी असलेल्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा-धारणी मार्गावरील मध्यप्रदेशच्या सीमेत असलेल्या धारखोरा धबधब्यावर दररोज हजारो पर्यटक गर्दी करतच आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एकीकडे जिल्ह्यात अमरावती जिल्हात कोरोनाने थैमान घातले असताना इथे मात्र फिजिकल डिस्टन्सचा पूर्ण फज्जा उडवून पर्यटक मौजमजा करताना दिसत आहे. तर अनेक हौशी पर्यटक पाण्यात उतरुन जीवघेणे फोटोसेशन करत आहे.



सध्या पावसाळा सुरू असल्याने मेळघाटचे सौंदर्य अधिकच फुलले आहे. या मेळघाटच्या सौंदर्यातील धबधबे पाहण्यासाठी राज्यातील पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. अशातच परतवाडा-धारणी मार्गावरील मध्यप्रदेशच्या सीमेतील धारखोरा या धबधब्यावर देखील पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली आहे. दोन महिन्यापूर्वी याच धबधब्यावर तीन तरुण पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता.


त्यानंतर या धबधब्यावर पर्यटकांना प्रशासनाच्यावतीने बंदी घातली होती. तरीसुद्धा प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता दररोज हजारो पर्यटक या धबधब्यावरून मौजमजा करत आहे. 


यामध्ये काही हौशी पर्यटक पाण्यात उतरून फोटोसेशन करत आहेत. एकीकडे जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढत असताना. इथं मात्र फिजिकल डिस्टन्स, मास्क न बांधणे याचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची भीती वाढण्याची दाट शक्यता आहे.