जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसेंना आफ्रिकेतून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खडसे यांच्या मोबाइलवर अज्ञातांनी फोन करून "संभाळून राहा", अशी धमकी दिलीये. यासंदर्भात खडसेंनी पोलिसात तक्रार केली आहे.


खडसेंनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता कॉल करणाऱ्याचं लोकेशन हे पूर्व आफ्रिकेतील भुरांडी या देशातून आल्याचं समोर आलं. गेल्या काही दिवसांपूर्वी खडसेंच्या विरोधक अंजली दमानियांनी पाकिस्तानातून धमकीचे फोन आल्याचा दावा केला होता. आता खडसेंना आफ्रिकेतून धमकीचा फोन आल्याने जळगावात खळबळ उडाली आहे.


खडसेंना गेल्या तीन दिवसात पाच वेळा ‘संभलके रहना’ अशा आशयाची धमकी देण्यात आली. कुणाचा तरी खोडसाळपणा म्हणून खडसेंनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र तीन दिवसात पाच वेळा फोन आल्याने खडसेंनी पोलिसात तक्रार दिली.