कोल्हापूर : भारतीय जनता पक्षाचा श्वास हिंदुत्व आणि विकास आहे. कोल्हापूर उत्तर हा हिंदुत्ववादी मतदारसंघ आहे. इथल्या मतदारांची केमिकल केमेस्ट्री बदलली आहे. पॉलिटकल केमिस्ट्री बदलली आहे. या मतदारसंघात दहशतीचे वातावरण आहे. हा महाराष्ट्र आहे की बंगाल असा प्रश्न पडला आहे. असे असले तरी जनता मतदानाला बाहेर पडेल आणि मतदान करेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघटित भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारसभेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल पंचशील येथे पत्रकार परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र केसरी गदा पटकाविल्याबद्दल फडणवीस यांनी कोल्हापुरचे पृथ्वीराज पाटील यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपच्यावतीने पृथ्वीराज पाटील याला कुस्तीच्या सरावासाठी 5 लाख रुपये जाहीर केले. 


राज्यात महाविकास आघाडीबद्दल लोकांमध्ये संताप आहे. कोल्हापुरात महापूर आल्यानंतर लोकांना अनेक आश्वासन दिलं. पण, आघाडी सरकार काहीही देवू शकले नाही. गोकुळच्या निवडणुकीसाठी लॉकडाऊन पुढे ढकलला त्यामुळे 400 लोकाचे निधन झालं असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला. 


कोल्हापुरात येताच बाळासाहेब ठाकरे यांचे एक पोस्टर पाहायला मिळायचं आणि एक ऊर्जा मिळत असे. आज आलो त्यावेळी पोस्टर पाहायला मिळालं. पण बाळासाहेब यांच्या फोटो सोबत सोनिया गांधी यांचा फोटो होता. माऊलीशी आमची दुश्मनी नाही, पण त्यांच्या मागे असणाऱ्या पालकमंत्र्याला विरोध आहे, असे त्यांनी सांगितलं.


मतदारांना धमकावले जात आहे.. महाराष्ट्र आहे की बंगाल आहे हे कळत नाही. पण आम्ही बंगाल मध्ये हे चालू दिल नाही.. मग कोल्हापूरात तरी कशी चालू देवू. जैन समाज संख्येने कमी आहे. पण  जीडीपी मध्ये मोठा आहे. महाराष्ट्र केसरीची गदा कोल्हापूरला आलीय. 12 तारखेला विजयाची गदा नानाच्या हाती द्यायची आहे, असे आवाहनही फडणवीस यांनी यावेळी केलं.