नागपूर : नागपुरात लवकरच मेट्रोच्या कमर्शियल 'ट्रायल रन'ला सुरुवात होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमर्शियल रनची तयारी जोरात सुरु असताना दुसरीकडे नागपूर मेट्रो रेलचे नागपुरात आगमन झाले. तीन डबे असलेल्या या गाडीचा प्रवास हैद्राबाद येथून सुरु झाला. 


सुमारे ५०० किलोमीटरचे अंतर कापत गुरुवारी हे डबे नागपूरला पोहोचले. एकूण ६७ मिटर लांबीची मेट्रो रेलवर आधीच्या मेट्रोप्रमाणे 'ग्रीनसिटी आणि संत्रनगरीची' ओळख देण्यात आली आली आहे.


नागपुरात येण्यापूर्वी या तीनही डब्यांची दोन वेगवेगळ्या ट्रॅकवर चाचणी करण्यात आली होती. त्यामुळे आता नागपूरच्या मेट्रो रूटवर ही मेट्रो धावण्यास सज्ज झाली आहे.


यापूर्वी तीन मेट्रोचे कोचेस ट्रायल रनसाठी हेंद्राबादहून नागपुरात आणल्या गेले होते. ट्रायल रनची सुरवात ३० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. 


आरडीएसओच्या चमूने ट्रायल रनची चाचणी केल्यांनतर मेट्रोला कमर्शियल रनसाठी हिरवा झेंडा दाखवला.