बुलडाणा : जिल्ह्यातील मेहकर येथील इमामवाडा परिसरामध्ये भिंत कोसळून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून दोनजण जखमी आहेत. मेहकरातील इमामवाडा चौकात राहणारे शेख कुटुंब गाढ झोपेत असताना मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घराची भिंत कोसळली. यामध्ये एकूण पाच जण मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भिंत कोसळताना मोठा आवाज झाल्याने शेजारी राहणारे नागरिक घटनास्थळी गेले. पोलिसांच्या मदतीनं मालीखाली दबलेल्या पाचजणांना बाहेर काढताना तीन जणांना मृत घोषित केलं. तर दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पती, पत्नी आणि लहान मुलाचा समावेश आहे. तर एक २० वर्षीय युवक आणि एक ८ वर्षीय लहान मुलगा गंभीर जखमी आहेत.