मुंबईतील सांताक्रूझ परिसरात असणाऱ्या गॅलेक्सी हॉटेलमध्ये भीषण आग लागली आहे. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही आगली लागली. आगीवर सध्या नितंत्रण मिळवण्यात आलं आहे. पण आगीत होरपळून तिघांचा मृत्यू झाला असून, 5 जण जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली आहे. हॉटेल पूर्ण रिकामी करण्याचं काम सध्या सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजून 17 मिनिटांच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या गाड्या यानंतर घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. हे चार मजल्यांचं हॉटेल असून, तिसऱ्या मजल्यावर आग लागली होती. आग लागली तेव्हा 6 जण अडकले होते. त्याकील 3 जणांचा मृत्यू झाला होता. तर इतर तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.  आग सध्या पूर्णपणे नियंत्रणात आहे. 



ही आग खोली क्रमांक 103 आणि 203 मधील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन, स्प्लिट एसी युनिट, पडदे, गाद्या, लाकडी फर्निचर इथपर्यंत मर्यादित होती. तसंच पहिल्या ते तिसऱ्या मजल्यापर्यंत सामान्य इलेक्ट्रिक डक्ट, लॉन्ड्री, ब्लँकेट, इलेक्ट्रिक वायरिंग यांना आगीची छळ बसली आहे.