अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : मुळशीतल्या खातरखडक धरणात तीन शालेय विद्यार्थी बुडून दुर्घटना घडलीय. जॅकलीन समर शाळेत समर कॅम्पसाठी ही मुलं दाखल झाली होती. चेन्नईतल्या ईसीएस मॅट्रिक्यूलेशन या शाळेतील हे विद्यार्थी असल्याचं समजतंय. १३ ते १५ वयोगटातील २० मुलं मुळशीतील जॅकलीन स्कूलमध्ये समर कॅम्पसाठी आली आहेत. मंगळवारी त्यांच्या कॅम्पचा पहिलाच दिवस होता. संध्याकाळच्या वेळी तीन मुलं खातरखडक धरणाच्या पाण्यात गेली. मात्र त्यांना पाण्याबाहेर पडता आलं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दानिश राजा, संतोष के आणि सर्वांना अशी बुडालेल्या मुलांची नावं आहेत. त्यांचा पाण्यात शोध घेतला असता दानिशचा मृतदेह हाती लागलाय. मात्र, इतर दोन विद्यार्थी मात्र अद्यापही बेपत्ता आहेत. 


उद्या सकाळी शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. परंतु, या घटनेमुळे उन्हाळी किंवा सुट्टीतील शिबिरांमधील सुरक्षिततेचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा समोर आलाय.