अमरावती : नराधम शिक्षकाने तीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा प्रकार अमरावती जिल्ह्यातल्या अंजनगाव सुर्जी येथे घडला आहे. आरोपी शिक्षक संजय नागे याला अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यातले अवैध धंदे उघड व्हावे यासाठी जानेवारी महिन्यात पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयं, बसस्थानक आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी ३०० तक्रारपेट्या ठेवल्या होत्या. या तक्रार पेट्या उघडल्या असता हा प्रकार उघड झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून संजय नागे तीन पीडित विद्यार्थिंनी सोबत अश्लील गैरवर्तन करत होता. तसेच विद्यार्थिंनींनी त्याला विरोध करायचा प्रयत्न केला असता तो त्यांना मारहाणही करत असल्याचं समोर आलं आहे. शिक्षकाच्या या गैरवर्तणुकीला कंटाळलेल्या या विद्यार्थीनींनी या शिक्षकाच्या सुरू असलेल्या कारनाम्याची तक्रार लिहून शाळेतील तक्रार पेटीत टाकून दिली. 


पोलिसांनी शाळेत महिला पोलिसांचं एक विशेष पथक पाठवून तपास केला असता हा प्रकार खरा असल्याचं उघड झालं. त्यानंतर आरोपी संजय नागे याला अटक करण्यात आली आहे.