पुणे :  मंगरूळ (ता. जुन्नर) येथील आंबेविहीर परिसरात एक चित्त थरारक घटना घडली. काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच या घटनेबाबत म्हणावे लागेल.
बिबट्याने या युवकावर केलेला हल्ला सुदैवाने थोडक्यात हुकला आणि त्याला नवे आयुष्य मिळाले. 


जुन्नरमधील आंबेविहीर परिसरात भागात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. सीताराम चंद्रकांत लामखडे हे सध्या देवाचे आभार मानत आहेत.  
लामखडे गाडी जोरात चालवीत असल्यामुळे बिबट्याची झेप मागच्या बाजुला गेली. त्यांच्या मागच्या डिक्कीला बिबट्याच्या पंजाचा ओरखडा दिसत आहे. यामुळे त्यांची गाडी डगमगली; त्यांनी मागे वळून पाहिले असता बिबट्या जाताना दिसले.
अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे त्यांना काहीही सुचतच नव्हते. त्यांनी घाबरलेल्या अवस्थेतच येऊन परिसरातील इतर लोकांना माहिती दिली. या परिसरात सुभाष नढे यांच्या शेतात वनखात्याने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे.