चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील ताडोबा वनपरीक्षेत्रात एक वाघीण मृतावस्थेत आढळली. मात्र, हा ताडोबातील वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू नसून तिची शिकार करण्यात आली आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या फाशात अडकून दोन वर्षांच्या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पात एका वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाघिणीची जणू शिकार करण्याचाच प्रयत्न केला असल्याचे उघड झाले आहे. शिकाऱ्यांनी लावलेल्या तारेच्या फाश्यात ही वाघीण अडकली. वाघिणीचे वय दोन वर्ष होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघीण ज्याठिकाणी मृताअवस्थेत आढलली. तेथे फासे आढळून आल्याचे दिसत आहे. या फाशात अडकून या वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे, अशी माहिती आता पुढे येत आहे. दरम्यान, या घटनेनंतर क्षेत्रसंचालक आणि कोअर विभागाचे उपसंचालकांनी घटनास्थळी भेट दिली असून याची माहिती घेतली. ताडोबात वनअधिकारी असताना अशी शिकार कशी झाली, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.  


दरम्यान, चंद्रपूरच्या गोंडपीपरी तालुक्यातील कोठारी जंगलात एका ग्रामस्थाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. नंदू कोठारी अस मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते परसोडी गावचे रहिवासी आहे.12 एप्रिलला नंदू कोठारी जंगलात मोहाची फूलं वेचण्यासाठी जंगलात गेले होते. मात्र बराच वेळ ते घरी न परतल्यामुळे शोधा शोध करण्यात आली. त्यानंतर जंगलातील कक्ष क्रमांक ५३० मध्ये त्यांचा मृतदेह अढळून आला. वनविभाग कर्मचाऱ्यांच्या मते नंदू यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय.